New GR Form Government Of Maharashtra Dated 21 september 2010


This article is taken from official site of GOVT OF MAHARASHTRA

NEW GOVERNMENT OF MAHARASHTRA GR


महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश


अधिमुल्याच्या आकारणीवरील निर्बंधामुळे, स्थानिक नागरी संस्था व राज्य शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होत आहे. अधिमुल्याचा मुख्य उद्देश पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी वापरणे हा होता. अधिमुल्याचे हे साधन, हस्तांतरणीय विकास हक्काच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे हस्तांतरणीय विकास हक्काच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करण्याच्या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवता येणार नाही. यास्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम २२ मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश राज्यपालांनी प्रस्थापित केला आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संबंधित विकास नियंत्रण विनियमांखाली अतिरिक्त तळजमीन निर्देशांक मंजूर करण्यासाठी किंवा विशेष परवानगी किंवा स्वेच्छाधिकारांचा वापर करण्यासाठी वेळोवेळी, राज्यशासन किंवा नियोजन प्राधिकरण निश्चित करील अशा दराने लादावयाची फी, आकार व अधिमूल्य याकरिता विकास नियंत्रण विनियमांमध्ये तशी स्पष्ट तरतूद उपरोक्त अध्यादेशात करण्यात आली आहे.


Related Articles

More articles: Maharashtra Government Resolution Government of Maharashtra GR Maharashtra Government

Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: