Pune The Historic City


Pune is the traditional and educational capital of Maharashtra state and is a witness of great historical events, here in this article I am providing brief information about city, its history, from where it emerged who ruled this city in past, its cultural background.

सांस्कृतीक‌‍‌‍ क्षेत्रांत पूर्वी पासून लाभलेला वारसा व महाराष्ट्रातील 'विद्येचं माहेरघर' म्हणून समजलं जाणारं पुणे शहर आज औद्योगिक विकासात्देखील आघाडीवर आहे. आज पुण्यात औद्योगासाठी, शिक्षणासाठी, व्यापारासाठी, सांस्कृतिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी दररोज हजारो प्रवाशी येतात.

अशा या सुधारलेल्या, पुढारलेल्या पुण्याचा इतिहास पहिला असता असे दिसून येते कि पूर्वी या ठिकाणी एक लहानशी वाडी होती जिचे नाव 'पुनवडी' असे होते. या वाडीच्या पूर्वेला कमार्ली व कासार्ली असी दोन गावे होती. पश्चिमेस व उत्तरेस शेतं होती. हि वाडी कसबा पेठेत काही बहगांवर बसली होती. वाडीत १०-१५ घरं होती, त्यात ब्राम्हणांची दोन, बाकीची कोळी, वाजंत्री यांची होती. वाडीतील ब्राम्हण मुसलमान झाल्यावर बादशहाने जमिनी इनाम म्हणून दिल्या व गावं मोडून सर्व वस्ती एक करून त्याला 'कसबे पुणे' असं नाव दिलं. पुढे तिच्या आसपास पाच पेठ बसवल्या.

अश्या तर्हेने 'पुनवडी' चं स्वरूप बदलत गेलं आणि कालांतराने त्याला 'पुणे' हे नाव पडलं. पुढे अल्लाहुद्धीन खलजी ने पुण्यावर अंमल बसवला.त्यानंतर बहामनी राज्य व नंतर बाल्शिवाजीने पुण्यात राज्यकारभाराची सूत्र हाती घेऊन हिंद साम्राज्याची स्थापना केली. पुढे पेशव्यांनी हिंदू साम्राज्याला बळकटी आणली, त्यानंतर थोरले बाजीराव, नानासाहेब व माधवराव पेशवे यांच्या काळापासून पुण्याला विशेष महत्व आले.

पुण्यात ऐतिहासिक, भौगोलिक अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, पुण्यातील 'कसबा गणपती' हे ग्रामदैवत आहे. कोणतेही शुभ कार्य 'लग्न अथवा मुंज' झाले कि प्रथम इथे दर्शनाला येतात. हि स्वयंभू मूर्ती आहे. जिजामाता, लाल महालात राहत असतांना बळ शिवराया समेत रोज दर्शन घेत. जवळच एक लहान बाग आहे तिथे 'लाल महाल' स्मारक बनविले असून जीजामातांचा पुतळा बसविण्यात आला आहे. मुठा नदीच्या काठावर शेरशहा चा लहान व मोठा दर्गा आहे. येथेच पूर्वी पुंनेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं होती.

शनिवारवाडा हि ऐतिहासिक वास्तू. हा सात मजली होता . पुढे तो जळाला, वाड्याभोवती तट, नगारखना चे काही अवशेष अस्तित्वात आहेत. दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी खिडकी आणि जांभूळ दरवाजा असे पाच दरवाजे वड्यात आहेत. पेशव्यांनी राजधानी पुण्यात आणली होती. तशेच ब्रिटीश सत्ता इथून घालवून देण्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं त्यांचा स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा स्तम्भ बांधण्यात आला.

भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, आर्यभूषण थिएटर, टिळक स्मारक मंदिर हि प्न्याची सांस्कृतिक केंद्रे यातून अनेक नाट्यकर्मी नि वसा घेतला. १८८० साली किर्लोस्कर संगीत मंडळीच पाहिलं नाटक 'शकुंतल' पुण्यात बुधवारात तसेच प्रभात फिल्म कंपनी येथेच वसली. बालगंधर्वा पासून ते छोटा गंधर्वपर्यंत, सवाई गंधर्व पासून हिंद गंधर्व यांच्या कलांना अंकुर फुटले, त्यांची ख्याती जगभर झाली.

पुण्याचा गणपती उत्सव लोकशिक्षण व लोकजागृतीचं कार्य साधणारा ठरला आहे. ज्ञानाची गंगोत्री सतत पुणेकरांवर वर्षाव करत राहिल्याने महामहोपाध्याय द. वा. पोतदारांपासून ते महासंगनका पर्यंत निर्माते येथेच विकसित झाले.

भौगोलिक दृष्ट्या पुणे हे शहर टेकड्यांनी वेढलेले असल्याने पुणे हिवेगर , थंड, स्वच्छ, मोकळं आहे. पुण्यात मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम होतो. पुण्यात स्थाईक होण्यासाठी अनेक जण येतात म्हणूनच या नगरीला
'पेन्शनरांचे पुणे' म्हंटलं जातं.


Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: