Educational Scholarship By Pune Municipal Corporation Under "Nagarvasti Vikas Yojana"


This resource is about "educational scholarship" announced by Pune Municipal corporation under "Nagarvasti vikas yojana". this scholarship is for 10th & 12th passed students. Read more about eligibility, rules & regulations & contact centers

Dear Friends,

Pune Municipal corporation announced "Educational scholarship" for 10th & 12th passed students under "Nagarvasti vikas yojana". Eligible students of 10th passed can get Rs. 15000/- & 12th passed can get 25000/- for their further studies. You have to submit fulfilled applications before 30th August 2012 at "Nagarvasti Vikas Yojana - Head Office - P.M.C. House, Pune. So hurry up friends to get a benefit of this scheme.

You can find detail information regarding this scholarship below........

प्रिय मित्रानो,
"नागरवस्ती विकास योजने" अंतर्गत पुणे महानगर पालिकेने पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न मौलाना अब्दुल कलम आझाद" योजनेंतर्गत रु. १५०००/- आणी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" योजने अंतर्गत रु. २५०००/- देण्याची योजना आहे. या योजने अंतर्गत खालील नियम व अटीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून छापील नमुन्यात अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्जाच्या छायाप्रतीही स्वीकारल्या जातील.

पात्रता :


१) सन २०११-१२ (मार्च- एप्रिल) या शैक्षणिक वर्षात किमान ८०% गुण आवश्यक
अथवा
२) महापालिकेच्या किंवा रात्र शाळेत असल्यास किमान ४०% गुण आवश्यक
अथवा
३) अपंगत्व आणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ७०% गुण आवश्यक
४) १० वी व १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेणे आवश्यक

नियम व अटी खालील प्रमाणे :


१) अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी आणी नियम सर्व विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहतील.
२) अर्ज नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा संपूर्ण अधिकार "मा. सह. महापलिका आयुक्त - नागरवस्ती योजना " यांच्याकडे राहील.
३) मुदतीत न आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
४) अर्ज जमा केल्यावर "पोच पावती" घ्यावी. अन्यथा अर्जाची जबाबदारी पुणे म.न.पा. ची राहणार नाही.
५) मंजूर झालेल्या धनादेश वाटपाचे कार्यक्रमासंबंधी जाहीर निवेदन वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. त्या नंतर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधावा.

संपर्क :


१) या योजनेचे छापील अर्ज सर्व क्षेत्रीय कार्यालयात दि. २ जुलै २०१२ पासून विनाशुल्क उपलब्ध होतील.
२) हे सर्व अर्ज पूर्णपणे भरून ३० ऑगष्ट २०१२ पर्यंत "नागरवस्ती विकास योजना, मुख्य कार्यालय - म.न.पा. भवन" या ठिकाणी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत जमा करावेत.

तरी मित्रानो, आपण सर्व जणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आणी आपल्या संपर्कात असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देखील कळवावे.

धन्यवाद.


Comments



  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: