महाराष्ट्र वनसेवा परीक्षा


This is for Maharashtra Forest Services exam. Those who are interested to appear for this exam, may go through this advertisement. If you think you are eligible then follow the process and apply for this exam. Thanks!

महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित,गट-अ व गट-ब ही पदं भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा परीक्षा घेण्यात येते. जंगलाची मालकी, व्यवस्थापन, संवर्धन हे सरकारकडे असते. त्यामुळे फॉरेस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. सरकारी सेवेत राहून या करिअरमध्ये पर्यावरण संरक्षणाचं महत्त्वपूर्ण कार्य आपण करू शकता. मोठ्या प्रमाणावर अधिकार या सेवेतील अधिका-यांना असतात. ही परीक्षा खालील पदांसाठी घेतली जाते.

सहायक वनसंरक्षक

( असिस्टंट कॉन्झव्हेर्टर ऑफ फॉरेस्ट) (गट अ)

वनक्षेत्रपाल

( रेंज फॉरेस्ट ऑफिसर)-(गट-ब)

पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, सांख्यिकी, वनशास्त्र, उद्यानविद्या या विषयांपैकी कमीत कमी एका विषयातील पदवीधर या परीक्षेसाठी पात्र असतात.

पूर्व परीक्षा

ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. सामान्य ज्ञान (१०० गुण) व गणित (१०० गुण) या विषयावर एकूण २०० गुणांची परीक्षा घेतली जाते. कालावधी २ तास असून गणित विषयाचा स्तर दहावीचा आहे. तर, सामान्य ज्ञानाचा स्तर पदवीपर्यंतचा आहे.

अभ्यासक्रम :

सामान्य ज्ञान (१०० गुण) - माध्यम मराठी आणि इंग्रजी

गणित (१०० गुण)- माध्यम इंग्रजी

मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षा ६०० गुणांची घेतली जाईल. या परीक्षेसाठी एकूण चार प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रश्नपत्रिका प्रत्येकी १०० गुणांच्या असतील. त्यासाठी ३ तासांचा कालावधी असेल. या प्रश्नपत्रिका सर्वांना अनिवार्य असतील. अन्य दोन प्रश्नपत्रिकांसाठी खालील १५ पैकी कोणतेही दोन वैकल्पिक विषय निवडण्याची मुभा उमेदवारांना असेल.

( कृषी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, भूशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, गणित, यंत्र अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, सांख्यिकी, वनशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र.)

वैकल्पिक विषयावरील प्रश्नपत्रिका प्रत्येकी २०० गुणांच्या असून, त्यासाठी ३ तासांचा कालावधी आहे. या परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.

मौख्यिक व व्यक्तिमत्त्व चाचणी

मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना चाचणीसाठी बोलावलं जातं. या चाचणीसाठी ७५ गुण असतात.

वेळापत्रक : वनसेवा पूर्व परीक्षेसाठीची जाहिरात येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. परंतु, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेची तारीख एमपीएससीने जाहीर केलीय. तसंच, या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रमही आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अभ्यासक्रम पाहून परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी. जाहिरात प्रकाशित झाल्यावर ऑनलाइन अर्ज भरावा.

वनसेवा पूर्व परीक्षा :

१२ फेब्रुवारी २०१२

वनसेवा मुख्य परीक्षा :

२८ एप्रिल २०१२ पासून.


Comments



  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: