Agra The City Of Taj Mahal


This article is guide to the Agra city, in this article I tried to provide information about various tourist spots in Agra, there history, how to reach, what to see, where to stay etc.I hope this article fond useful to the people planning to visit this beautiful city.

आग्रा



दगडांतून प्रकट केलेल्या हृदयातील प्रेमासाठी हे ऐतिहासिक ठिकाण जगप्रसिद्ध आहे. सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आग्रा शहरातील मध्य युगीन भव्य इमारतीही पर्यटकांना आकर्षित करून घेतात. प्रामुख्याने ताजमहालसाठी आग्रा जगविख्यात असला तरी त्या व्यतिरिक्त इथे महत्वपूर्ण, सुरेख ठिकाण़ं आहेत. ती बघून माणस थक्क होतात. आग्र्या जवळ फतेपूरसिक्री आदि पर्यटन स्थळहि आहेत. त्यामुळे इथे येताना पर्यटकांना अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते तसच आग्र्याच अव्यवस्थित रूप, घाण आणि फसवणुकीची दात शक्यता यामुळे पर्यटक बिचकतातहि.

प्रेक्षणीय स्थळे



ताजमहाल:

प्रेमाची प्रतिक असलेली हि अतिभव्य इमारत बघून माणूस अक्षरशः थक्क होऊन जातो. जगातलं हे निश्चीत्तच आश्चर्य आहे. या अतिशय सुंदर, अनोख्या व शब्दात वरणन करण्याच्या पलीकडे असलेल्या ताज महालमुळेच अग्र्याची नोंद जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रामुख्याने झालेली आहे. मुघल सम्राट शहजाहान याने आपली लाडकी पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ हा अत्भूत महाल बांधला. १६३१ मध्ये बांधकाम सुरु झालेला ताजमहाल पूर्ण होण्यास तब्बल बावीस वर्ष लागली. शुभ्र संगमरवराची हि इमारत दुहेरी चाबुत्र्यावर उभारलेली आहे. चांदण्या रात्री ताजमहालाच्या सौंदर्य अवर्णनिय असतं. त्यामुळेच शरद् पौर्णिमेला रात्री ताजमहालच्या सौंदर्याच रसपान करण्यासाठी अलोट गर्दी असते. गेल्या काही वर्षापासून या सौंदर्याला प्रदूषणाच गालबोट लागलय.अर्थात प्रदूषणाचा ताज महालावर परिणाम होऊ नये म्हणून प्रयत्न चालू आहेतच. लाल दगडांच्या भव्य तटबंदीच्या आत ताज महाल आहे. या तटबंदीला तीन दिशांना प्रवेशद्वार आहेत. उत्तरेला यमुना नदी असल्यामुळे त्या बाजूला प्रवेश द्वार नाही. दक्षिणेकडील दरवाजा सर्वात मोठा व प्रमुख प्रवेश द्वार आहे. ताज महालाच्या चारही कोपर्यांमध्ये चार भव्य मनोरे आहेत. या मनोऱ्यांच्या मधोमध सतराव्या शतकात दफन झालेल्या सहजाहन व मुमताज चा मकबरा आहे.

किल्ला:

मुघल सम्राट अकबराने १५५६ मध्ये बांधलेला हा किल्ला तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या कुशलतेच उदाहरण आहे. या किल्ल्याला अमरसिंह दरवाजा, दिल्ली दरवाजा, दरयाइ दरवाजा आणि दर्शनी दरवाजा आहेत. मात्र, आता पर्यटकांसाठी केवळ अमरसिंह दरवाजा उघडा असतो.
किल्ल्यात दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, नगीना मशीद, जहांगीर महाल, मोती मशीद, हराम अंगुटी बाग, जास्मीन टॅावर इ. प्रेक्षनिय आहेत.

रामबाग:

हिरवळ आणि सौंदर्याने हि बाग पर्यटकांना आकर्षित करते. बाबर ने बांधलेले हे उद्यान म्हणजे भारतातील पाहिलं मुगल उद्यान समजलं जातं. विश्रांतीसाठी बाबर ने हा बगीचा निर्माण केला होता. 'आराम बाग' वरून त्याचे नाव आता रामबाग झाले आहे.
शेजारच्या यमुने मुले हे उद्यान अधिकच सुंदर भासतं. बागेच्या मधोमध असलेला संगमरवरी हौद अत्यंत आकर्षक आहे.

एतमादुदौला:

हि इमारत आग्र्यातील एक प्रेक्षणीय इमारत आहे. नुरजहान ने आपले वडील मिर्झा गयासुद्दिन बेग यांच्या स्मुर्तीनिमित्य उभ्र्लेल्या या इमारतीच्या सभोवताली आयताकृती उद्यान आहे. इथे वेगवेगळया वनस्पतीच्या रंगातील चित्र व जाळ्या अत्यंत प्रेक्षणीय आहेत. या इमारतीद्वारे जहांगीर, नुर जहान च्या चित्रकला प्रेमाची साक्ष पटते.

चीनी का रोजा:

बादशहा जहांगीर ने १६१८ मध्ये आपला पंतप्रधान कविराज शकूर उल्ल खान याच्या स्मित्यार्थ हा मकबरा बांधला. यात चीनी मातीच्या टाइल्सचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे इमारतीचं नाव 'चीनी का रोजा' अस पडलं. या आयताकृती इमारतीच्या मध्यभागी भव्य गोल घुमट आहे.

स्वामी बाग:

आग्र्या पासून आठ किलोमीटर अंतरावर राधास्वामी पंथाच्या प्रव्रर्तकाचं हे भव्य शुभ्र स्मारक आहे. येथिल नक्षीकाम अत्यंत देखणं आहे

जामा मशीद:

सहजहांची सर्वात लाडकी मुलगी जहाआरा ने १६४८ मध्ये हि मशीद बांधली. लाल व धवल दगडांनी बांधलेल्या या माशिदिचं स्थापत्य अतिशय आगळ-वेगळ आहे. लाल किल्ल्याच्या जवळचं हि मशीद आहे.

सिकंदरा:

सम्राट अकबराच हा मकबरा आहे. स्वतःच्या आयुष्यातच अकबराने हा मकबरा बांधला होता, पण त्याचा मुलगा जाह्न्गीर याने १६१३ मध्ये बांधकाम पूर्ण केलं. माकब्र्याच्या चाहुबजुना कोपर्यात चा मनोरे आहेत. या माक्ब्र्याच्या बांधकामात हिंदू व मुसलमान स्थापत्य कौश्क्याचं सुरेख मिश्रण आढळतं. सिकांदार्याची मुख्य इमारत पाच मजली असून तिच्या सभोवताली भव्य बगीचा आहे.

कठे थांबाल?



होटेल पत्ता

१. ताज व्यू फात्तेबाद रोड
२. क्लार्क शिरज फात्तेबाद रोड
३. मुगल शेराटन फात्तेबाद रोड
४. अथिती फात्तेबाद रोड
५. अमर फात्तेबाद रोड
६. टूरिस्ट बंगला राजमंडी स्टेशन
७. चंद्र्महाल राज कि मंडी

कसे जायचे?



हवाई मार्ग:

आग्रा दिल्ली, वाराणशी आणि खुजरोह ला हवाई मार्गाने जोडला आहे.

बस मार्ग:

आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २,३ आणि ११ वर आहे. दिल्ली, हरिद्वार, बरेली इ. शहरंतून अग्रायासाठी नियमित बस सेवा आहे. बऱ्याच शहरांतून टॅक्सी सेवा देखील उपलब्ध आहे.
रेल्वे मार्ग:
देशातील सर्व प्रमुख शहरातून अग्र्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.

प्रमुख रेल्वे

कुठून गाडी क्रं. व नाव

१. अहमदाबाद ५०४५ गोरखपूर एक्स्प्रेस
२. दिल्ली ४००४ कॅट इंटरसीटी एक्स्प्रेस
२४०६ गोंडवाना एक्स्प्रेस
२६१८ लाक्ष्य द्वीप एक्स्प्रेस
२१८० ताज एक्स्प्रेस
३. हावडा ३००७ उद्यान आभा एक्स्प्रेस


पर्यटन माहिती केंद्र:
१९१. माल रोड, आग्रा.
एस.टी.डी. कोड- ०५६२


Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: